किल्लारी असो नाहीतर करोना... आपल्याकडे आपत्ती ‘अपघात’ नाही, तर ‘प्रघात’ व्हायला लागला आहे
आपल्याकडे आपत्ती अपघात नाही, तर प्रघात व्हायला लागला आहे. आपलं नेतृत्व हे आपत्तीपूरक आहे. या सगळ्यांच्या बाबतीत आपण किती जागरूक आहोत? आपत्ती व्यवस्थापणाचे प्रश्न पत्रकार, स्वयंसेवी संस्था कशा पद्धतीने मांडतात? विधानसभा, लोकसभांमध्ये या प्रश्नावर कोण बोलतं? हे कोणाचेच विषय का नाहीत? जिथे आपत्ती व्यवस्थापानाचा कारभार नसतो, तिथे आपत्तीचाच कारभार असतो. हे ढळढळीत दिसत असूनसुद्धा आपण आपल्याला शहाणपण का आलेलं नाही?.......